Prakash ambedkar and gunratan sadavarte 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : ...तर औरंगजेबाची कबर समुद्रात फेका; आंबेडकरांच्या कृतीचा सदावर्तेकडून नाव न घेता निषेध

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरून राज्यात मोठा गदारोळ झाला आहे. यावरून प्रकाश आंबेडकरांवर सातत्याने टीका होत आहे. त्यातच आता एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या या कृतीवर नाव न घेता टीका केली आहे.

औरंगजेब, अजमल कसाब हे देशात कधीच प्रेरणा, वैचारिक स्थान होऊ शकत नाहीत. अमेरिकेच्या लष्कराने ओसामा बिन लादेन याचा मृतदेह मध्य समुद्रामध्ये फेकला होता. त्याचप्रमाणे अशा प्रवृत्तींच्या लोकांची कबरही समुद्रात नेऊन फेका, म्हणजे वारंवार कोणी या कबरीवर पुष्प अर्पण करणार नाही, अशा शब्दांत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोणाचेही नाव न घेता निशाणा साधला.

एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ॲड. सदावर्ते रविवारी येथे आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, देशात सध्या सेक्युलर, रोखठोक अशा व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे देशातील नागरिकांची डोकी भडकविण्यात येत आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहादपेक्षा व्हॉट्सॲप जिहाद भयंकर बनत चालला आहे. ओसामा बिन लादेन, दाऊद अशा विचारांची माणसे परदेशात बसून असे व्हॉट्सॲप ग्रुप चालवत आहेत. अशांचे देशात कोणाशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करा.

एसटी बँकेचे ६४ हजार सदस्य असून त्यातील ४८ हजार मतदार हे एसटी कष्टकरी जनसंघाशी निगडित आहेत. यामुळे वर्षानुवर्षे शरद पवार यांच्या विचारांशी संबंधित असलेली या बँकेतील व्यक्तींच्या म्हणजेच सावकारीविरुद्ध कष्टकरी अशी ही निवडणूक आहे. यासाठी एसटी कष्टकरी जनसंघ जनतेमध्ये आला असून आम्ही निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT