solapur mahapalika sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनीवरील महापालिकेचे तिबार पंपिंग बंद! अधिकाऱ्यांच्या हुशारीमुळे 65 लाखांची बचत; औज बंधाऱ्यात 2 महिने पुरेल इतके पाणी; वन विभागाचे अधिकारी आज सोलापुरात

पाकणी येथील महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र वन विभागाच्याच जागेत असून त्याला परवानगीच नाही. आता पुन्हा वन विभागाच्याच ३ हेक्टर जागेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी सहा हेक्टर जमीन मिळावी, असा प्रस्ताव वन विभागाला सादर करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मृग नक्षत्राचा पाऊस झाल्याने उणे ६० टक्क्यांवरील उजनी धरण आता उणे ४८ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे महापालिकेचे धरणावरील तिबार पंपिंग सोमवारी (ता. १७) बंद करण्यात आले आहे. तिबार पंपिंगची निविदा १.३२ कोटींची होती आणि मक्तेदाराला एक महिन्यासाठी निम्मी रक्कम दिली होती. पण, त्यानंतर पुढील दोन महिन्याची रक्कम दिवसाला देण्याचे ठरले होते. आता १० दिवसांत पावणेसात टीएमसी पाणी आल्याने महापालिकेचे तब्बल ६५ लाख रुपयांची बचत झाली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात उजनी धरण सर्वात निच्चांकी पातळीवर (उणे ६० टक्के) पोचले होते. त्यामुळे महापालिकेला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुबार पंपिंगसाठी जवळपास एक कोटींचा खर्च करावा लागला तर तिबार पंपिंगसाठी एक कोटी ३२ लाख रुपयांची निविदा काढावी लागली. अधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे तिबार पंपिंगचे ६५ लाख रुपये वाचले आहेत. धरण आता उणे ३५ टक्क्यांवर आल्यावर दुबार पंपिंगदेखील बंद होणार आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारे औज-चिंचपूर हे बंधारे पावसामुळे सध्या फुल्ल आहेत. त्यात सध्या ५५ ते ६० दिवस पुरेल पाणी इतके पाणी आहे. दुसरीकडे हिप्परगा तलावात देखील दीड फूट पाणी वाढल्याची माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.

नागपूरचे वन अधिकारी आज सोलापुरात; महापालिकेने मागितली ६ हेक्टर जमीन

महापालिकेच्या वतीने सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम सुरू असून आतापर्यंत ९० किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. आता देवडी, पाकणी व हिवरे या परिसरातील वन विभागाच्या जागेतून पाइपलाइन जाणार असल्याने त्याची स्थळ पाहणी करायला नागपूरच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी उद्या (मंगळवारी) सोलापुरात येणार आहेत. दरम्यान, पाकणी येथील महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र वन विभागाच्याच जागेत असून त्याला परवानगीच नाही. आता पुन्हा वन विभागाच्याच ३ हेक्टर जागेत १८ कोटींचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सहा हेक्टर जमीन मिळावी, असा प्रस्ताव वन विभागाला सादर करण्यात आला आहे. त्याबदल्यात वन विभागाला आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील पर्यायी जमीन जिल्हा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. नवीन बदलानुसार आता जेवढी वन विभागाची जमीन घेतली जाईल, तेवढीच पर्यायी जमीन या विभागाला द्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT