tiger  sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली; म्हणून बिहारने केली 'ही' मागणी

महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बिहार सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे.

राजेश रामपूरकर

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बिहार सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वाघांची मागणी केल्याची माहिती आहे. वाल्मीकी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांसोबत बिहारमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात यावर चर्चा झाली असून तसे पत्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विभागाला पाठविले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात ३४० ते ३५० पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यापैकी सुमारे २०० पेक्षा अधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यासह ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. चार वर्षांनी होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना सध्या केली जात आहे. त्याचे कामही युद्धपातळीवर सुरु असून महाराष्ट्रात वाघांची संख्या आणखी वाढू शकते. ही स्थिती लक्षात घेऊनच अन्य राज्यांनी महाराष्ट्राकडे वाघांची मागणी केली जात आहे. त्यामध्ये बिहार सरकारचा समावेश आहे. बिहारमधील वनाधिकारी आणि मंत्रालयीन अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांचे स्थलांतरावर विचार करण्यात आला. तेथील सरकारने महाराष्ट्रातील वन्यजीव विभागाकडे पत्र पाठविले आहे. त्यात वाघाची मागणी केलेली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मानव- वन्यजीव संघर्ष वाढता

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे. वाढलेला संघर्ष कमी करण्यासाठी सरकार वाघाची संख्या वाढत असल्याने त्याचे स्थलांतरण करायचे का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांमधून त्याला विरोध केला होता. त्यामुळे हा प्रस्तावाला ठाकरे सरकारने थंडबस्त्यात टाकला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षक प्राणी त्या परिसरात सोडण्यात येत आहे. त्यांची संख्या वाढल्यानंतर वाघ सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. दरम्यान, वाल्मीकी व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनी प्रकल्प वाघ सोडण्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले.

‘एनटीसीए’कडे अधिकार

बिहार सरकारसह अन्य राज्यांकडूनही महाराष्ट्राकडे वाघांसाठी मागणी केली जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे सध्यातरी यावर तोडगा निघालेला नाही.

स्थलांतरासाठी...

  • वाघ सोडण्यापूर्वी त्या परिसरातील तृणभक्षक प्राण्याची घनतेचा अभ्यास करण्यात येईल

  • प्रायोगिक तत्त्वावर वाघ सोडण्याबाबत विचार होईल

  • पन्ना आणि सारिस्का या प्रकल्पात वाघ सोडण्यासाठी हा अभ्यास करणे आणि प्रत्यक्षात वाघ सोडण्यासाठी सात वर्षाचा कालावधी लागला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT