Tilari Project 
महाराष्ट्र बातम्या

Tilari Project : गोवा आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या तिलारी प्रकल्पासाठी ३३० कोटी रुपये मंजूर, शिंदे सरकारचा निर्णय

Sandip Kapde

Cabinet meeting : तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली.

तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळाच्या बैठकीतील निर्णय :

  • तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची कामे ३० ते ३५ वर्षापुर्वी झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या आणि गळती होणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत बैठकीत एकमत झाले. त्यासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त २२ प्रकल्पबाधितांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

  • गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव दिला, त्यावर धरणाचा सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

  • गोव्यातील अभियंत्यांच्या क्षमता बांधणीसाठी महाराष्ट्राकडून सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले.

  • तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी कालवे पुनरूज्जीवन आणि संनियंत्रणाच्या दृष्टीने संयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT