0corona_498.jpg 
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर ! आज 107 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह; बार्शी तालुक्‍यात 50 रुग्ण 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज (शनिवारी) सर्वाधिक 107 रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता 817 झाली असून मृतांची संख्या 34 वर पोहचली आहे. आज सर्वाधिक रुग्ण वैराग येथे 22 सापडले आहेत. 


तालुकानिहाय रुग्ण 

  • अक्‍कलकोट : 154 
  • बार्शी : 171 
  • करमाळा : 6 
  • माढा : 26 
  • माळशिरस : 11 
  • मंगळवेढा : 3: 44 
  • उत्तर सोलापूर : 88 
  • पंढरपूर : 41 
  • सांगोला : 5 
  • दक्षिण सोलापूर : 268 
  • एकूण : 817 

'या' गावात सापडले नवे रुग्ण 
उत्तर सोलापुरातील कारंबा, तिऱ्हे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील आदर्श चौक, दत्त नगर येथे प्रत्येकी एक, खवणी दोन, सोहाळे, मसले चौधरी, देवडी येथे प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्‍यातील कोंडबावी, अकलूज येथे प्रत्येकी एक तर गुरसाळे येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. माढ्यातील रिधोरे, मोडनिंब येथे प्रत्येकी दोन, भोसरे येथे तीन, चिंचगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला आहे. तर दक्षिण सोलापुरातील कासेगाव, तांदुळवाडी, बरुर, कुंभारी, मुळेगाव तांडा, मंद्रूप येथे प्रत्येकी एक, कंदलगावात दोन, बोरामणीत पाच, भंडारकवठ्यात तीन रुग्णांची भर पडली आहे. पंढरपुरातील रजपूत गल्लीत एक आणि अक्‍कलकोटमधील खोडवे गल्ली, आझाद गल्ली, फत्तेसिंह चौक, मोरे वस्ती, करजगी, सलगर येथे प्रत्येकी एक रुग्ण, संजय नगरात दोन, भारत गल्लीत तीन, पुकाळे प्लॉट चार, नागणहळ्ळी चार रुग्ण आढळले आहेत. बार्शीतील भोसले चौक, मांगाडे चाळ, देसाई प्लॉट, फुले प्लॉट, भवानी पेठ, मनगिरे मळा, उपळाई ठोंगे, भालगाव, नागोबाची वाडी, गाताची वाडी, वाणेवाडी, साकत पिंपरी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. बारंगुळे प्लॉट, जयशंकर मिलसमोर, व्हनकळस प्लॉट येथे प्रत्येकी दोन रुग्णांची भर पडली आहे. कसबा पेठेत चार, सुभाष नगरात तीन, वैराग 22, पिंपळगाव ढाळे तीन असे एकूण 107 रुग्णांची भर पडली. शनिवारी तिऱ्हे येथील 47 वर्षीय महिला आणि बार्शीतील जयशंकर मिल परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT