महाराष्ट्र बातम्या

सीईटी अर्जासाठी आज शेवटचा दिवस 

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य शासनाच्या उच्च शिक्षणांतर्गत असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी आज (ता.८) शेवटचा दिवस आहे. या परीक्षा १५ जुलै ते ६ आॅगस्ट दरम्यान होणार आहेत. 

कोरोनामुळे तीन व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम, बीएड, एमएड, बीएस्सी-बीएड, बीए-बीएड, बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. 

सीईटी सेलने या परीक्षांचे सुधारीत वेळपत्रक जाहीर केले आहे. मात्र, अर्ज भरण्यास अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, त्याची मुदत ८ मे रोजी रात्री संपत आहे, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवेश परीक्षा व तारीख पुढील प्रमाणे 
बीपीएड - १५ व १६ जुलै 
एलएलबी (३ वर्ष) - ६ आॅगस्ट 
एमएड - २४ जुलै 
बीए बीएड/बीएससी बीएड - २४ जुलै 
बी एड/ एमएड- २९ जुलै 
एमपीएड - २४ जुलै 
बीपीएड - २४ जुलै 
एलएलबी (५ वर्ष) -२४ जुलै 

परीक्षा केंद्र बदलण्यासाठी मुदत 
अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी पदवीच्या प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार ‘एमएचटी सीईटी २०२०’ साठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यासाठी १० जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT