BJP Criticize Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

'संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का?'

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदचा सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईतील रस्ते बंद

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदचा सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईतील रस्ते बंद

राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेली संजय राऊत यांची आजच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांकडून टीका सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आता भाजपाने (BJP) संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे आहेत का? असे वक्तव्य भाजपाने केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. (today press conference of sanjay raut)

भाजपाने (BJP) ऑफिशिअल ट्वीट करत राऊत यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास ठाकरे सरकारने (Thackeray Govt.) प्रतिबंध घातला आहे. तर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदचा सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईतील रस्ते बंद करण्यात आले आहेत. संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आज वाहतूक संदर्भात ट्वीट केले आहे. यात काही काळासाठी वाहतुक बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आज राजकीय कार्यक्रम म्हणजे शिवसेनेची पत्रकार परीषद असल्याची दाट शक्यता असल्यानं हे बदल करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे चार वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परीषद घेणार आहेत. आता यावरून टीका सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT