tamasha ban sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात तमाशा बंदी; कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे

‘कोरोना रुग्ण वाढत होत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यामुळे तमाशाचे रात्रीचे खेळ बंद झाले असून कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे राहीले आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘कोरोना रुग्ण वाढत होत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यामुळे तमाशाचे रात्रीचे खेळ बंद झाले असून कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे राहीले आहे.

चाकण - ‘कोरोना रुग्ण (Corona Patients) वाढत होत असल्याने राज्य सरकारने (State Government) पुन्हा निर्बंध (Restrictions) लागू केले आहेत. यामुळे तमाशाचे रात्रीचे खेळ बंद झाले असून कलावंतांपुढे (Actors) पुन्हा संकट (Problem) उभे राहीले आहे,’ अशी माहिती लोकनाट्य तमाशा फडमालक, कलावंत महासंघाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर (Raghuvir Khedkar) यांनी दिली.

ते म्हणाले, ‘तमाशाचे खेळ बंद झाल्याने फड मालक व कलाकारांनी पुन्हा आपले घर गाठले आहे. सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी तमाशा कार्यक्रमांना परवानगी दिल्यानंतर तमाशाचे फड कार्यक्रमांसाठी राज्याच्या विविध भागात फिरत होते. गेले दोन वर्षांपासून बंद असलेले तमाशा फड सुरू झाले होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याने सरकारने राज्यात रात्रीची संचारबंदी पुन्हा लागू केली आहे. परिणामी तमाशाच्या कार्यक्रमांवर बंदी आली आहे. तमाशा बंद झाल्याने राज्यातील सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक कलावंताच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.’

तमाशा फडमालक व कलावंत नितीनकुमार बनसोडे म्हणाले, ‘तमाशाचे कार्यक्रम बंद झाल्याने तमाशा फड मालक, कलाकार यांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होणार आहे. दोन वर्षांपासून तमाशा संकटात सापडला आहे. मागील महिन्यांत कार्यक्रम सुरू झाल्याने तमाशाचे अर्थचक्र पुन्हा फिरू लागले होते. मात्र, आता पुन्हा कार्यक्रम बंद झाल्याने फड मालक, कलाकारांनी करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.’

तमाशा ही कला जिवंत राहण्यासाठी कार्यक्रमांना सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत परवानगी देण्यात यावी. काही ठिकाणी दिवसाही कार्यक्रम व्हावेत. यासाठी सरकारने पोलिसांना आदेश देऊन फड मालक, कलाकार यांना सहकार्य करावे.

- रघुवीर खेडकर, अध्यक्ष, लोकनाट्य तमाशा फडमालक, कलावंत महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT