Corona Vaccination sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील ६६ टक्के नागरिक लसवंत; चार जिल्हे ५० टक्क्यांखाली

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात लसीकरणाचा (corona vaccination) वेग वाढला असून ६६ टक्के नागरिक लसवंत झाले आहेत. राज्यातील ६ कोटी ८७ लाख ९ हजार २६७ नागरिकांचा दुसरा डोस (vaccination second dose) पूर्ण झाला आहे; तर १३ जिल्ह्यांत ६६ टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. १८ जिल्ह्यांत ६६ टक्के ते ५० टक्क्यांच्या दरम्यान लसीकरण (vaccination drive) झाले आहे. मात्र राज्यातील चार जिल्हे असेही आहेत जिथे ५० टक्क्यांहून कमी लसीकरण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

औरंगाबाद, अकोला, बीड आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून कमी लसीकरण झाले  आहे. या जिल्ह्यांत सरासरी ४५ ते ४७ टक्के लसीकरण झाले आहे. औरंगाबादमध्ये ४७.४८ टक्के, अकोल्यामध्ये ४७.०३ टक्के, बीडमध्ये ४७.४८ टक्के, तर नंदूरबार ४५.२७ टक्के एवढेच लसीकरण झाले आहे. यामुळे चिंता वाढली असून येथील लसीकरण वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे दोन्ही डोस पूर्ण करून सुरक्षित व्हावे, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून आवाहन केले जात आहे. १०० टक्के पहिला डोस ६६ टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांसह भंडारा, चंद्रपूर, सांगली सातारा, गोंदिया, रायगड, वर्धा, रत्नागिरीसारखे १३ जिल्हे आहेत. या १३ जिल्ह्यातील मुंबई, पुणे आणि भंडारा या तीन जिल्ह्यांत १०० टक्के पहिला डोस पूर्ण झाला असून उर्वरित दहा जिल्हे ९४ ते ९९ टक्क्यांदरम्यान आहेत; तर राज्याच्या सरासरी दोन्ही लसीकरणाच्या ६६ टक्क्यांहून कमी असलेल्या १८ जिल्ह्यांत ७३ ते ४५ टक्के एवढे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतील ९३.८७ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT