Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan sakal media
महाराष्ट्र बातम्या

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देशभरात स्वच्छता अभियान

सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) (रेवदंडा, अलिबाग) यांच्या वतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. shri Appasaheb Dharmadhikari) आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी (Dr. shri sachindada Dharmadhikari) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरात स्वच्छता अभियान (Cleaning campaign) राबविण्यात आले.

मुंबई उपनगरात रविवारी (ता.२७) घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शासकीय कार्यालये, रुग्णालये, स्मशानभूमी आणि रुग्णालयांचा समावेश होता. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत अभियान पार पडले. या अभियानात हजारो श्रीसदस्यांनी कोरोना नियमांचे पालन करत हातात ग्लोज, मास्कचा वापर करत अभियान यशस्वी केले. या वेळी मुंबईतून १५.६४० टन सुका कचरा आणि ५.४३१ टन ओला कचरा जमा करत श्रीसदस्यांनी पालिकेच्या ताब्यात दिला.

मुंबई व उपनगरातील ११ रुग्णालये आणि १३ स्मशानभूमी, तसेच तीन शासकीय कार्यालयाची स्वच्छता केली. १ मार्च रोजी वडाळा पाच गार्डन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ तसेच वरळी, बोरिवली अशा ठिकाणी रक्तदान शिबिर होणार असल्याचे श्रीसदस्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT