महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; विरोधकांना संपविण्यासाठी.. पवारांचा थेट आरोप

मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला |

सकाळ वृत्तसेवा


Nipani News:
‘‘मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले; पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकांना संपविण्यासाठी कुठल्याही थराला ते गेले आहेत.

दिल्लीत उत्तम रीतीने सरकार चालविले जात असताना, मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निपाणीत बुधवारी (ता. १) सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. शरद पवार म्हणाले, ‘‘भाजपने विविध प्रकारची अस्त्रे वापरून विरोधकांना अडकवण्याचे काम सुरू ठेवले आहे. शिवाय जनतेला भूलथापा देण्याचे कामही बंद नाही.

याउलट राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरिबांसाठी योजना अमलात आणल्या. तरुणांकडे मोठी ताकद असून, त्यांना मोदी सरकार दुष्ट प्रवृत्तीकडे घेऊन जात आहे. परिणामी देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुढील काळात घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला उलथवणे गरजेचे आहे. देशातील यावेळच्या निवडणुकीकडे जगातील लोकांचे लक्ष लागले आहे.’’

रोजगार हिरावला!


अहमदाबादचे आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले, ‘‘भाजप सरकारने हजारो युवकांचा रोजगार हिरावला आहे. शेतमालासह इतर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून सर्वांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय भाजप काळात महागाई वाढली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT