raigad fort shivaji maharaj samadhi  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raigad: नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडावर शिवप्रेमींची गर्दी!

सकाळ डिजिटल टीम

Raigad: नववर्षाचे स्वागत व सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. रायगडावर नववर्ष साजरे करण्यासाठी येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस यंत्रणा व पुरातत्त्व विभागाचे सुरक्षारक्षक सज्ज झाले आहेत.


रायगडावरील सहल सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते. त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्यावर येण्यास पसंती देतात. रायगड किल्ला हे पवित्र ठिकाण असल्याने येथे शिवप्रेमी व कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या अधिक असते.गडाचे पावित्र राखूनच गडावर वावरले पाहिजे, असा शिवप्रेमींचा दंडक असल्याने नववर्ष साजरे करताना मर्यादा न पाळणाऱ्यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागते. आता पोलिसही गडावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.


स्वराज्याची राजधानी असलेला रायगडावर सध्या थंडीचा हंगाम असून मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणांहून सहली दाखल होत आहेत. सध्या शाळांना नाताळची सुटी असल्याने व ३१ डिसेंबर उत्साहात साजरा करण्याकरिता अनेकांची पावले किल्ल्याकडे वळली आहेत. रायगड किल्ला हे पवित्र ठिकाण असल्याने या ठिकाणी हौशी व मौजमज्जा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मज्जाव केला जातो. असतो. यामुळे रायगडावर नववर्षासाठी स्वागत करण्याकरिता येणारे शिवप्रेमी आपली मर्यादा राखून नववर्ष स्वागत करतात.

तळीरामांवर लक्ष
नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच रायगड किल्‍ल्‍याचे पावित्र्य राखले जावे, याकरिता महाड तालुका पोलिस यंत्रणा सज्ज झाले आहेत. रायगड रोप वे, चित्त दरवाजा, शिवसमाधी व राज दरबार अशा मुख्य ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तळीरामांना रोखण्यासाठी पोलिसांकडून तसेच पुरातत्त्व विभागाकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. रोप वे व पायी जाणाऱ्यांवर लक्ष दिले जाणार असून मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. पाचाड नाका तसेच नातेखिंड येथे वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

व्यावसायिकांची चलती
शालेय सुट्यांमुळे पर्यटकांची वाढलेली गर्दी तसेच नववर्ष स्वागतासाठी रायगडावर येणारे शिवप्रेमी व पर्यटकांमुळे सध्या रायगड किल्ला गजबजला आहे. त्यातच नववर्ष स्वागतालाही गडावर गर्दी होणार असल्याने व्यावसायिकही तयारीत आहेत. पर्यटकांनी आगाऊ आरक्षणे केली आहेत त्यामुळे रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी तसेच रायगड परिसरातील निवास व्यवस्था व हॉटेल हाऊसफुल झाले आहेत. गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने स्थानिक व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. घरगुती निवास व्यवस्था, घरगुती जेवण व स्थानिक वाहतूक यांची देखील मोठी चलती आहे. काही मिनिटांतच रायगडावर जाण्याकरता रोप-वेची सुविधा असल्याने रायगड रोप-वेवरही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

छत्रपती शिवराय महाराष्‍ट्राचे दैवत असल्याने गडावर कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. रायगड किल्ला व महत्त्वाच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. गडाचे पावित्र्य येथे येणाऱ्या प्रत्येकाने राखावे.
- आर.पी.मायने, पोलिस निरिक्षक, महाड तालुका पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

SCROLL FOR NEXT