nashik sakal
महाराष्ट्र बातम्या

Tomato Price: काय सांगता! नाशकात टोमॅटो चक्क 30 रुपये किलो... या ठिकाणी या अन् घेवून जा

अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किंमती १५० रूपये किलोंपेक्षा जास्त झाल्या आहेत.

Aishwarya Musale

सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या असून यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसली आहे. अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किंमती 150 रूपये किलोंपेक्षा जास्त झाल्या असून पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर कमी प्रमाणात होऊ लागला आहे.

तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक नेहमीच नाशिककरांसाठी नवनवीन उपक्रम बनवत असतो. गेल्या ५-६ वर्षांपासून सर्व नागरिकांना ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेल्या भाज्या मिळाव्यात व त्याचबरोबर जो शेतकरी या भाज्या आपल्या शेतात लावतो, आणि त्याचा फायदा होण्यासाठी रोटरी क्लब ने या उपक्रमाची सुरुवात केली होती.

शेतकरी दर रविवारी आपला भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन जातात. आणि नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी दराने देण्याचा प्रयत्न देखील करतात. जेव्हा काही भाज्यांचे भाव खूप जास्त असते तेव्हा देखील हे रोटरी क्लब बाजारात स्वस्त दराने भाज्या देतात. टोमॅटोचे सध्या भाव ₹150.00 प्रती किलो असले तरी यांच्या बाजारात टोमॅटो फक्त ₹ 30.00 प्रती किलो ग्राहकांना दिले जातात.

दर रविवारी हा बाजार सकाळी 8.30 ला सुरू होऊन साधारणपणे १० वाजेपर्यंत भरत असतो. तसेच या 1 जुलै पासून "उदोजी शैक्षणिक संग्रहालय" या ठिकाणी बाजार भरणार आहे. नवीन वर्षात या जागेत खूप चांगली सुरुवात झाली आहे. मविप्र सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे यांनी याचे उद्घाटन केले आहे.

या झालेल्या उद्घाटनाला, कम्युनिटी सर्विस डायरेक्टर, पास्ट प्रेसिडेंट,बोर्ड डायरेक्टर्स, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, मंथ लीडर्स व संपूर्ण कम्युनिटी सर्व्हिस नोन मेडिकल व रोटरी क्लबच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. याचा फायदा जवळपास 100 रोटरी सदस्य व ग्राहक घेत आहेत. याचा नाशिकच्या नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी रोटरी क्लबची विनंती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal Statement : "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

T20 World Cup Super 8s Scenario : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे स्थान पक्के; उर्वरित ६ जागांसाठी भारत-पाकिस्तानसह कोणात शर्यत?

JioHotstar Subscription Free : फ्रीमध्ये बघा भारत-पाकिस्तान T20 World Cup मॅच, 'या' आहेत 3 सोप्या ट्रिक..

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने वॉरंटच्या आधारे १२ ठिकाणी छापे

IND vs PAK : भारताने पाकड्यांना पराभवाचे पाणी पाजले! ८ विकेट्स अन् ५९ चेंडू राखून मिळवला विजय, सेमीच्या दिशेने वाटचाल

SCROLL FOR NEXT