Roshni Shinde beating case 
महाराष्ट्र बातम्या

Roshni Shinde beating case: रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट; महिला आयोगाने घेतली दखल

शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

धनश्री ओतारी

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना फेसबुक पोस्ट टाकण्यावरून शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं प्रकरणं चांगलंच तापलं आहे. दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. महिला आयोगाने दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल आहेत. (took notice of the Roshni Shinde beating case women comishtion of maharashtra )

ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली.

दरम्यान, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ठाकरे, विचारे, आव्हाड रोशनी शिंदेंचा जीवही घेऊ शकतात असा गंभीर आरोप केला आहे. रोशनी शिंदे यांच्या जिवाला धोका असून, त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्रही दिले आहे.

रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Mohammed Shami चा काढला काटा! सातत्याने धावा करणाऱ्या 'मुंबई'च्या खेळाडूकडे आगरकरचं दुर्लक्ष; पुनरागमन झालं अशक्य

आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले

Rahul Gandhi : 'राहुलजी! लवकर लग्न करा... आम्ही मिठाईच्या ऑर्डरची वाट पाहतोय'; राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

शुभमन गिल Asia Cup साठी संघात नकोय! सूर्यकुमारने केलेला विरोध? पण गंभीर-आगरकर यांनी...

SCROLL FOR NEXT