torana fort aerial view
torana fort aerial view  
महाराष्ट्र

शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड

सकाळवृत्तसेवा

शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड !
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर 'तोरणा व राजगड' आहेत. दुसऱ्या पदराला 'भुलेश्वर रांग' असे म्हणतात.
या गडावर पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून याला 'तोरणा' असे नाव मिळाले असे म्हटले जाते. याशिवाय हा गड जिंकत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण लावले असं म्हणतात. 
झुंजार माची, बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप ! बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण बालेकिल्ल्यात शिरतो. किल्ल्यावर जाताना थेट बालेकिल्ल्यातील प्रवेश हेही तोरण्याचे वैशिष्टय़ आहे.
आत शिरताच समोर दोन टाक्या दिसतात. तोरण आणि खोकड अशी त्यांची नावे. इथेच तटावर तोरणजाईच्या घुमटी आहेत. 

#तोरणा किल्यावर बांधलं स्वराज्याच तोरण अन तोरण्यावर भगवा फडकला.

इसवी सन १६४७चा तो प्रसंग! स्वराज्य स्थापनेचे स्वप्न घेऊन शिवराय इथे तोरणा गडाच्या पायथ्याशी  होते. गड होता विजापूरच्या बादशाहकडे, पण किल्लेदार होता मराठा! त्या किल्लेदाराला बोलावून महाराजांनी काय जादू केली कोणास ठाऊक .  पण दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरचे बादशाही झेंडे  खाली उतरले आणि मराठी जरीपटका फडकू लागला. राजे विजयी मुद्रेने गडावर आले. गड स्वराज्यात आला. दुरुस्तीचे आदेश दिले . त्यातच  स्वराज्यासाठी  दुसरा शुभसंकेत म्हणावा कि काय पण त्या दुरुस्तीच्या जागी मोहरांनी भरलेले २२ हंडे मिळाले. ! मग त्याच जागी या तोरणजाईची स्थापना झाली आणि या संपत्तीतून शेजारच्याच मुरुंबदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची राजधानी राजगड आकारास आली.
मेंगाईच्या मंदिराशेजारी गडावरील महादेव, तोरणेश्वराचे मंदिर आहे. 

तोरण्याच्या या आभाळातील उंच जागीच्या घराबद्दल जेम्स डग्लस हा इंग्रजी लेखकही कौतुकाने म्हणतो,
“If Sinhgad is a cave then Torna is an eagle’s nest“ - James Douglas.


-‘सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल!’


इसवी सन १८८०मध्ये हा डग्लस तोरणा भेटीवर आला होता. तो पुढे लिहितो, ‘शिवाजीने जिंकलेला हा पहिला मोठा किल्ला. या किल्ल्याभोवती त्याने मराठी राज्याचा पसारा वाढवला. ज्या मराठी राज्याने मुघल बादशाहचे आसन हलविले, त्याचे हे उगमस्थान आहे. या ठिकाणी एकेकाळी कितीतरी लढाया झाल्या. पण आता तर इथे फक्त अवशेष राहिले आहेत. 

काळाच्या आड गेलेल्या या  तोरणा गडाकडे पाहून त्या  विदेशी डग्लसचेही मन हेलावले.
तोरण्याची ही दुर्गमता-उंचीबद्दल मुघलांच्या नोंदीतूनही काही माहिती मिळते. १० मार्च १७०४ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ठेवले- ‘फुतूहुल्घैब’! म्हणजे ‘दैवी विजय’! मग हा ‘दैवी विजय’ घेत हातमखान नावाचा किल्लेदार इथे काम करू लागला, पण काही दिवसांतच त्याला या ‘फुतूहुल्घैब’मधील भयाणता टोचू लागली. हातमखानला सतावणारी ही भीती आजही या उंच जागी आले, की जाणवते. भोवतीचा तळ पाताळाप्रमाणे खोल वाटू लागतो. तोरणा खरोखरच एखाद्या उंच जागीचे गरुडाचे घरटे भासू लागते.

* इथेच वाकल्या झुकल्या त्या गर्विष्ठ माना *
महाराष्ट्राचे भाग्य इथेच घडले 
आमचा राजा इथेच महाराजा झाला. 
इथे डागलेल्या प्रत्येक तोफेने 
प्रत्येक घोषणेने आणि गर्जनेने 
दिल्लीच्या तख्ताला हलवले. 
इथेच आमची भूमी राजश्रिया विराजित सकल सौभाग्य सम्पन्न झाली !!


#गडावरील प्रेक्षणीय स्थळे 

१ तोरणजाई देवी मंदिर 
२ मेंगाई मंदिर 
३ झुंजार माची 
४ तोरणेश्वर महादेवाचव मंदिर 
५ बुधला  माची 
६ बालेकिल्ला म्हणजे गडावरील सर्वात उंच बाजू 

# गडावर जाण्याचे मार्ग 

गरुडाच्या घरट्यावर जाण्यासाठी राजगग किल्ल्याकडून तोरण गड चढणे ,
पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
किंवा  वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT