Police Transfer sakal
महाराष्ट्र बातम्या

Police Transfer : राज्यातील पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या; मिटके शहरात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५८ पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५८ पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यात संदीप मिटके हे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात तर, किरणकुमार सूर्यवंशी, नितीन गणापुरे, बापूराव दडस यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आलेली आहे. (Transfers of Deputy Superintendent of Police in State police transfer news)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकार्यांमध्ये बदल्याचे वारे सुरू आहेत. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ तांबे हे सेवानिवृत्त झाल्याने एक जागा रिक्त होती. संदीप मिटके यांची नाशिक शहर आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

त्याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणमधील कळवणचे उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांची अहमदनगर येथे आर्थिक गुन्हेशाखेत, मनमाड उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांची उदगीर (लातूर) येथे उपविभागीय अधिकारी, नाशिक ग्रामीणचे सुनील भामरे यांची मुंबई लोहमार्ग येथे सहायक आयुक्त, मालेगाव ग्रामीणचे पुष्कराज सूर्यवंशी यांची माणगाव ( रायगड) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर, किरणकुमार सूर्यंवंशी यांची कळवण उपविभागीय अधिकारी, नितीन गणापुरे यांची मालेगाव उपविभागीय अधिकारी, बापूराव दडस यांची नाशिक ग्रामीणला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झालेली आहे.

कड यांच्याकडे पंचवटीचा पदभार

ठाणे येथून नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात बदली झालेले व नुकतेच राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले मधुकर कडे यांच्याकडे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पंचवटी पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे. सहा वर्षांपूर्वी कड यांची नाशिकमधून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात बदली झाली होती. कड यांनी यापूर्वी नाशिकमध्ये पंचवटीसह अंबड, भद्रकाली या पोलिस ठाण्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात? पायलट लोकांचा असतो विरोध

Latest Marathi News Updates : पाचोर्‍यातील ग्रामीण भागातील मरीआईचा भंडारा साजरा करण्याची परंपरा कायम

Phulambri Accident : भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील तिघांना चिरडले..! पतीसह मुलगा व मुलगी जागीच ठार; पत्नी गंभीर जखमी

Dahihandi 2025: यंदा दीड लाख गोविंदांना विमाकवच, मुख्यमंत्र्यांचे क्रीडा विभागाला निर्देश

SCROLL FOR NEXT