Police Transfer sakal
महाराष्ट्र बातम्या

Police Officer Transfers : राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता. ६) काढण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता. ६) काढण्यात आले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे पोलिस मुख्यालय आणि शहर वाहतूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार होता. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर, गडचिरोली येथील राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक विवेक मासाळ यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

राज्यातील अन्य पोलिस उपायुक्त/पोलिस अधीक्षकाचे नाव, विद्यमान आणि कंसात बदलीचे ठिकाण -

संदीप पालवे, पोलिस अधीक्षक- एटीएस, छत्रपती संभाजीनगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड), संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त-लोहमार्ग, मुंबई (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर), सचिन गुंजाळ, पोलिस उपायुक्त ठाणे शहर (एटीएस, छत्रपती संभाजीनगर), दत्ताराम राठोड, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, अमरावती (अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग नागपूर), विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त नवी मुंबई (मुंबई), रश्मी नांदेडकर, पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग (नवी मुंबई), प्रदीप चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी- सचिवालय मुंबई (पोलिस उपायुक्त मुंबई), मीना मकवाना, पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर (ठाणे शहर), दत्ता नलावडे, पोलिस उपायुक्त मुंबई (लोहमार्ग, मुंबई), राजू भुजबळ, पोलिस उपायुक्त मुंबई (मुख्य सुरक्षा अधिकारी, सचिवालय, मुंबई), रूपाली दरेकर, पोलिस अधीक्षक - नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर (महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर), अनिता जमादार, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर (नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर), लता फड, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक पुणे (पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT