Trimbakeshwar Controversy 
महाराष्ट्र बातम्या

Trimbakeshwar Controversy: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, घेतला मोठा निर्णय

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकारावरुन सध्या राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे.

धनश्री ओतारी

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकारावरुन सध्या राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात आखाडा परिषदेने उडी घेतली आहे. वादामागील सत्य शोधण्यासाठी आखाडा परिषदेने समितीची स्थापना केली आहे. येत्या 1 जूनपर्यंत ही समिती आपला निर्णय देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर वादामागील सत्य शोधण्यासाठी आखाडा परिषदेने समितीची स्थापना केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या वेगवेगळ्या आखाड्यातील 12 साधू आणि महंतांची ही समिती असणार आहे. धूप दाखवण्याची परंपरा होती की नव्हती? त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न खरच झाला होता का? यामागील सत्य ही समिती शोधून काढणार आहे.

त्र्यंबकेश्वर प्रकरणातील नेमकं सत्य ही 12 जणांची समिती शोधणार असून येत्या 1 जूनला समिती आपला निर्णय देणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची परंपरा नसल्याचे तसंच बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्यास आखाडा परिषद कठोर निर्णय घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी एका गटाकडून धार्मिक यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी काही जणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंदिरातील पुरोहितांनी त्याला विरोध केला. मंदिरातील सुरक्षा रक्षकांनीही अडवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

त्यानंतर या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी यानंतर रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे या प्रकाराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT