सोलापूर : येथील भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात सकाळी ९ ते ५ या वेळेत महाराष्ट्रविरुद्ध त्रिपुरा संघात रणजी सामना रंगणार आहे. सामन्याच्या निमित्ताने सोलापूरकरांना आंतरराष्ट्रीय संघातील अजिंक्य राहाणे, ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे यासह अन्य खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्मार्ट सिटीतून कोट्यवधींचा निधी खर्च करून भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले आहे. यापूर्वी या मैदानावर रणजी सामने झाले आहेत. आता पुन्हा एकदा या मैदानावर महाराष्ट्र संघाचा रणजी सामना त्रिपुरा संघाविरुद्ध रंगणार आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी केली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू २७ जानेवारी रोजी सायंकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर २८ व २९ जानेवारीला ते मैदानावर सराव करतील. त्यानंतर ३० जानेवारीपासून त्यांचा रणजी सामना सुरु होईल. क्रिकेटप्रेमींना सामना पाहण्याची सोय डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने केली असून मोजक्या प्रेक्षकांसाठी पासदेखील ठेवले आहेत.
शुक्रवारी बीसीसीआयचे क्युरेटर येणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अंपायर, स्कोरर या सामन्यासाठी येणार आहेत. स्टेडिअमवर ड्रेसिंग रूमची तयारीदेखील केली आहे. २४ जानेवारीला सामन्याची विकेट (पिच) तयार करण्यासाठी ‘बीसीसीआय’चे क्युरेटर अभिजित पोरपडे हे सोलापुरात येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवरमध्ये करण्यात आली आहे. सामन्यापूर्वी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव धैर्यशील मोहिते पाटील, सहसचिव चंद्रकांत रेंबर्सू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन केले जात आहे.
रणजी सामन्याची जय्यत तयारी सुरु
३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान सोलापुरातील भारतरत्न इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिमवर महाराष्ट्र संघाचा त्रिपुरा संघाविरुद्ध रणजी सामना होणार आहे. सामन्याच्या अनुषंगाने सर्व समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मदतीने जेवण विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे. असोसिएशनकडून मैदानाची निगा राखली जात असून क्रीडाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा सामना यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास आहे.
- चंद्रकांत रेंबर्सू, सहसचिव, डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.