truck driver strike for second day 
महाराष्ट्र बातम्या

टँकर-ट्रक चालकांच्या संपाचा मोठा फटका! पेट्रोल पंपावर रांगा, जाणून घ्या कशी आहे राज्यात स्थिती?

truck driver strike for second day हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदारांनी तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. त्याच आज दुसरा दिवस आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदारांनी तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. त्याच आज दुसरा दिवस आहे. सोमवारी वाहतूकदारांच्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, संपामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांचा समावेश असल्याने त्याचा मोठा फटका राज्यात पाहायला मिळाला आहे. (truck driver strike for second day Queues of vehicles at petrol pumps know situation)

इंधन ट्रकांचे चालक संपात सहभागी असल्याने पेट्रोल पंपावर लोकांनी सोमवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तेच चित्र आज सकाळी देखील पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल संपल्याचा पाट्या लागल्या आहेत. दुसरीकडे, काही जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत सुरु आहे. नागपूरमध्ये वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे.

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचा पाट्या लागल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा व्यवस्थित सुरु आहे. पण, पेट्रोल-डिझेल मिळण्याचे बंद होण्याच्या शक्यतेने लोकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत. भाजीपाला, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठ्यावरही यामुळे परिणाम पडला आहे.

नाशिकमध्ये १ हजार इंधन ट्रक चालक संपावर गेले आहेत. धुळ्यामध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. बीडमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. वाहनधारकांच्या संपामुळे एसटी बस सेववर देखील परिणाम होणार आहे. संप असाच सुरु राहिला तर पेट्रोल पंपावर इंधन संपण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांनी पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केलीये. अनेक ठिकाणी पंप लवकरच बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे.

ट्रान्सपोर्ट युनियन आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेली चर्चा सोमवारी निष्फळ ठरली आहे. त्यामुळे मंगळवारीही वाहनचालकांचा संप सुरु आहे. आज संप मिटला नाही तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक पेट्रोल पंपावर एक ते दोन दिवस पुरेल इतकाच इंधन साठा आहे. डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT