Truck drivers agitation turns violent Protesters esakal
महाराष्ट्र बातम्या

ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; बांबू घेऊन आंदोलक पोलिसांच्या मागे

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केलं. परंतु या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून येत आहे.

संतोष कानडे

नवी मुंबईः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केलं. परंतु या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

केंद्र सरकारविरोधात देशभर ट्रक चालकांचं आंदोलन सुरु आहे. नवी मुंबईतल्या जेएनपीटी मार्गावर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ट्रक आणि डंपर चालकांनी रस्त्यावर वाहनं उभी केल्याने पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काहीजण बांबू घेऊन पोलिसांच्या मागे लागले. यावेळी पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घटनेमध्ये काही पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT