महाराष्ट्र

नगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती; जोडप्याला पेटवले, तरुणीची मृत्यूशी झुंज संपली

सकाळवृत्तसेवा

निघोज (जि. नगर) : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या तरुणीचा पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री मृत्यू झाला. रुक्‍मिणी मंगेश रणशिंग (वय 18) असे तिचे नाव आहे. तिचा पती मंगेश चंद्रकांत रणशिंग (वय 23) अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 1 मे रोजी या दांपत्याला मुलीचे वडील, काका व मामा यांनी दोघांना पेटवून दिले होते. दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मुलीच्या वडिलांचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेत रुक्‍मिणी 70 टक्के भाजली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना पारनेर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तिचा जबाब घेतला होता. त्यात, वडील रामा रामफल भरतिया, मामा घनश्‍याम मोहन राणेज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया यांनी आम्हा दोघांवर पेट्रोल ओतून, पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे तिने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी सांगितले, की निघोज येथे गवंडी काम करणारा मंगेश व रुक्‍मिणीचा प्रेमविवाह झाला होता. 1 मे रोजी पत्नी रुक्‍मिणीला (रा. उत्तर प्रदेश, हल्ली निघोज) भेटण्यासाठी वाघाचा वाडा (निघोज) येथे गेला होता. त्यापूर्वी या पती-पत्नीचे स्वयंपाकावरून भांडण झाले होते. म्हणून रुक्‍मिणी माहेरी आली होती. मंगेश रुक्‍मिणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्‍मिणीचे वडील, मामा आणि काका यांनी तिला मंगेशसोबत न पाठवता त्याला मारहाण केली. मात्र, रुक्‍मिणी मंगेशबरोबर जाण्यास निघाली असता, तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले आणि घराला कुलूप लावून निघून गेले. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. 

मंगेश व रुक्‍मिणी यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तिचे वडील, काका व मामा यांचा त्यास विरोध होता. पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्‍मिणी यांचे जबाब 4 मे रोजी नोंदविले. त्यात त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून पोलिसांनी रुक्‍मिणीचा मामा घनश्‍याम राणेज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना अटक केली. त्यांना पारनेर सत्र न्यायालयाने 10 मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. रुक्‍णिमीचे वडील रामा रामफल भरतियाचा शोध सुरू असून, त्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT