Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case esakal
महाराष्ट्र बातम्या

डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘या’ ७ जणांचे पाच महिन्यांचे ‘सीडीआर’ अन्‌ मोबाईल टॉवर लोकेशन सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता ट्विस्ट निर्माण झाला आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासह एकूण सात जणांचे १ डिसेंबर २०२४ ते १ मे २०२५ पर्यंतचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स रिपोर्ट) व मोबाईलचे टॉवर लोकेशन संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी १७ जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावे, असा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता ट्विस्ट निर्माण झाला आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासह एकूण सात जणांचे १ डिसेंबर २०२४ ते १ मे २०२५ पर्यंतचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स रिपोर्ट) व मोबाईलचे टॉवर लोकेशन संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी १७ जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावे, असा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांना आता या कॉलच्या अनुषंगाने अधिक तपास करावा लागू शकतो.

डॉ. वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी राहत्या घरात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. यात संशयित आारोपी मनीषा मुसळे यांना अटक झाली. पोलिसांना दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले, मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांच्या युक्तिवादामुळे त्यांचीच जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर मनीषाने न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला.

खटल्याच्या सुनावणीपूर्वी ॲड. नवगिरे यांनी डॉ. शिरीष यांच्यासह त्यांचा मुलगा डॉ. अश्विन, मुलगी नेहा, आई डॉ. उमा व सून डॉ. शोनाली यांच्यासह अन्य दोघे, अशा एकूण सात जणांचे १ डिसेंबर २०२४ ते आत्महत्येच्या दिवसापर्यंतचे मोबाईल टॉवर लोकेशन व ‘सीडीआर’ जतन करून ठेवावेत किंवा न्यायालयात सादर व्हावेत, अशी मागणी केली होती. ज्यामुळे मनीषा निर्दोष असल्याची बाजू आम्हाला भक्कमपणे मांडता येईल, असा युक्तिवाद ॲड. नवगिरे यांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आहे.

तीन दिवसांत दहा कॉल तर पाच महिन्यांत किती?

आत्महत्येच्या दिवशी डॉ. शिरीष यांना एकाच क्रमांकावर तीन कॉल आले होते. तसेच १६ ते १८ एप्रिल दरम्यान दहा वेळा डॉक्टर एकाच व्यक्तीला खूप वेळ बोलले होत. त्यामुळे घटनेच्या दिवशी ती व्यक्ती कोठे होती, ती व्यक्ती नेमकी कोण, कोणत्या कारणाने त्यांच्यात एवढे संभाषण झाले, या बाबी संशयित आरोपीच्या बचावासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी त्यांच्याकडील डेटा ठरावीक काळानंतर नष्ट करण्यापूर्वी डॉ. शिरीष यांच्यासह एकूण सात जणांचे ‘सीडीआर’ व त्यांच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावे किंवा जतन करून ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ॲड. नवगिरे यांनी न्यायालयाकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

लग्नानंतर लगेचच रश्मिकाकडे गुड न्यूज! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

SCROLL FOR NEXT