solapur district sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील ‘या’ 7 मतदारसंघात ट्विस्ट; ऐनवेळी पक्ष बदलून उमेदवारी, एबी फॉर्म न मिळाल्याने काहींनी भरला अपक्ष अर्ज; दक्षिण सोलापूर, पंढरपूर, सांगोल्यात आघाडीत बिघाडी

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, बार्शी व मोहोळ या सहा मतदारसंघात चमत्कारिक राजकीय घडामोडी घडल्या. तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर व सांगोल्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, बार्शी व मोहोळ या सहा मतदारसंघात चमत्कारिक राजकीय घडामोडी घडल्या. तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर व सांगोल्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. महायुतीतील शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांसह युवासेना शहरप्रमुखाने स्वराज्य पक्षात प्रवेश करून आपल्याच मित्रपक्षाच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले.

जिल्ह्यातील चमत्कारिक राजकीय घडामोडी

  • १) सोलापूर दक्षिणमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्यास आपण अपक्ष लढणार नाही, असे ठणकावून सांगणारे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी दुपारी अचानकपणे अपक्ष अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली खरी, पण शेवटपर्यंत त्यांना ‘एबी’ फार्मच मिळाला नाही.

  • २) माढ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली. तर आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला. आमदार बबनराव शिंदे यांनीही अपक्षच अर्ज भरला. दुसरीकडे महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली. विशेष म्हणजे त्या काँग्रेसकडून इच्छुक होत्या आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांचीही भेट घेतली होती.

  • ३) जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघात बिघाडीचे चित्र आहे. सांगोला मतदारसंघ महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाला सुटेल, अशी शक्यता होती. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सांगोल्यात शेकापने स्वतंत्रपणे दंड थोपटले आहेत.

  • ४) सोलापूर शहर मध्य मतदारसंघ न मिळाल्याने महायुतीमधील शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख, सोलापूर शहर प्रमुख आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडत संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश करत लगेचच सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

  • ५) बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजप स्वत:कडे घेईल, अशी सर्वांनाच खात्री होती. मी पुढील निवडणूक भाजपकडूनच लढेन, असे त्यांनी जाहीर देखील केले होते. मात्र, त्यांना उमेदवारीसाठी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. त्यांनी पक्ष प्रवेश करताच त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.

  • ६) पंढरपूरमधून माजी आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक होते. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने येथून अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदाराचा सामना करतील.

  • ७) मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली. पण दुसऱ्याच दिवशी पक्षाने उमेदवार बदलला आणि राजू खरे यांना तेथून मैदानात उतरवले. त्यामुळे सिद्धी कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या संजय क्षीरसागर यांना डावलल्याने तेही अपक्षच मैदानात उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : गणपतीला कोकणात गेलेले परतीच्या मार्गावर, रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल,आधुनिक स्वयंचलित तराफ्याद्वारे होणार विसर्जन

एक वर्ष झालं आजारी, गोष्टी हातातून निसटण्याआधी थांबायला हवं; जाकिर खानने केली मोठ्या ब्रेकची घोषणा

Panchang 7 September 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT