accident  sakal
महाराष्ट्र बातम्या

Accident News : मराठवाड्यात पहाटे दोन अपघात, चौघांचा मृत्यू

संतोष कानडे

औरंगाबादः मराठवाड्यातल्या बीड आणि जालना जिल्ह्यात आज पहाटे दोन अपघात झाले. या अपघातामध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पहिला अपघात पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान जालना जिल्ह्यातल्या परतूर येथे झाला. कारमध्ये पती-पत्नी प्रवास करत होते. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. आग लागताच पती बाहेर पडला मात्र पत्नीचा होरपळू मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविता सोळुंके असं होरपळून मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. पहाटेच्या दरम्यान कारला अपघात झाल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर मदत पोहोचली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरा अपघात बीड शहरावजळ झाला आहे. नगरहून लग्नासाठी जात असतांना एका कारला हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरु आहेत.

बीडहून पेंडगावच्या दिशेने निघालेली ही कार चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला. त्यांचं वय ३० ते ३२ असल्याचं सांगण्यात येत आहे. तर एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT