Solapur city Chain Snatching

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

दोघांना बीडमधून पकडले! काकाची दुचाकी घेतली, तुळजापुरात मद्यपान केले अन्‌ सोलापुरात आले, दीड लाखांचे गंठण हिसकावून गेले; पोलिसांनी 200 CCTV तपासले अन्‌...

दोघेही अल्पवयीन असून त्यातील एकाविरुद्ध पूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत. काकाची दुचाकी घेऊन तो दुसऱ्या एका मित्रासोबत तुळजापुरात आले होते. त्याठिकाणी मद्यपान केले आणि दोघेही चोरीसाठी सोलापुरात आले. गंठण हिसकावून दोघेही पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जुना पुना नाका ते अरविंदधाम या रोडवरील मेडप्लस मेडिकलसमोर ७ एप्रिलला सायंकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी विजयालक्ष्मी धोंडिराम सावळे (वय ६६, रा. अवंती नगर) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. दुचाकीस्वार बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. फौजदार चावडी पोलिसांच्या पथकाने दुचाकीस्वारांना बीडमध्येच पकडले आणि सोलापुरात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. दोघेही अल्पवयीन असून त्यातील एकाविरुद्ध पूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत. काकाची दुचाकी घेऊन तो दुसऱ्या एका मित्रासोबत तुळजापुरात आले होते. त्याठिकाणी मद्यपान केले आणि दोघेही चोरीसाठी सोलापुरात आले. गंठण हिसकावून दोघेही पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केले आहेत.

फिर्यादी विजयालक्ष्मी सावळे या दोन मैत्रिणींसमवेत सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वॉकिंगसाठी बाहेर पडल्या. तिघीही बोलण्यात व्यस्त होत्या. बोलत असल्याने तिघीही हळूहळू पुढे येत होत्या. चोरीच्या उद्देशाने त्या रोडवर थांबलेले दुचाकीस्वार तिन्ही महिलांमागून पुढे गेले. थोड्या अंतरावर काही सेकंद थांबून पुन्हा परत फिरले. जाताना त्यांनी ज्या महिलेच्या गळ्यात दागिने पाहिले, त्याच महिलेच्या गळ्यात हात घालून त्यांचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले.

फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड पोलिसांचे प्रत्येकी एक पथक, शहर गुन्हे शाखेची सात पथके त्यांच्या शोधासाठी मेहनत घेत होते. खबऱ्यांच्या माध्यमातून गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या पथकाने त्या दोघांनाही शोधून काढले.

२०० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले अन्‌...

बीडमधील दोघे दुचाकीवरुन चोरीच्या उद्देशाने सोलापुरात आले होते. येताना ते तामलवाडी रोडने सोलापुरात आले आणि जाताना पुणे रोडने गेले. जाताना त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत नव्हते आणि ते कोणत्या रोडने गेले याचाही अंदाज येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सोलापूर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही पडताळले आणि त्यांचे चेहरे स्पष्ट झाले. खबऱ्यांच्या माध्यमातून त्यांना पकडले. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT