mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आचारसंहितेपूर्वी दोन हप्ते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची १५ नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल १५ नोव्हेंबरपूर्वी वाजणार आहे. या दरम्यान आचारसंहितेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल १५ नोव्हेंबरपूर्वी वाजणार आहे. या दरम्यान आचारसंहितेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यावरील निर्णय याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. त्यासाठी राज्यभरातील अडीच कोटी महिलांनी अर्ज केले आणि त्यांना १ जुलै २०२४ पासून लाभ देण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना दीड हजारांऐवजी २१०० रुपये देण्याचीही ग्वाही देण्यात आली. ही योजना महायुतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरली. आता नोव्हेंबर ते जानेवारी या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या, २८९ नगरपालिका व २९ महापालिका आहेत.

पुढे फेब्रुवारीत १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडू शकते. दरम्यान, लाडक्या बहिणींना ई-केवायसीमुळे दिवाळीतही ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. आता आचारसंहिता लागणार असल्याने नोव्हेंबरचाही हप्ता न मिळाल्यास महिलांची नाराजी वाढू शकते. त्यामुळे लाभार्थींना दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाऊ शकतो, जेणेकरून योजनेतील महिला नाराज होणार नाहीत, हा त्यामागील हेतू असणार आहे.

‘ई-केवायसी’साठी मिळणार मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थींसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसीची मुदत आणखी काही दिवस वाढू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लाडकी बहीण योजनेची स्थिती

  • सध्याचे अंदाजे लाभार्थी

  • २.१० कोटी

  • दरमहा अपेक्षित निधी

  • ३,१५० कोटी

  • दोन महिन्यांसाठी निधी

  • ६,३०० कोटी

  • ‘ई-केवायसी’ची मुदत

  • १८ नोव्हेंबर

ई-केवायसी केल्यास पुढे नियमित मिळेल लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींनी ६० दिवसांत ई-केवायसी करावी, असे शासनाचे आदेश आहेत. ई-केवायसीनंतर पात्र लाभार्थींचा लाभ पुढे नियमित सुरु राहील. आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणुका संपेपर्यंत लाभ देता येणार नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी करून घ्यावी.

- दिपक ढेपे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT