Naxal attack 
महाराष्ट्र बातम्या

Naxal attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद

बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवर नक्षलवाद्याचा हल्ला

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नाकाबंदी सुरु होती. याचदरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. तर एकजण जखमी झाला आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज (दि. 20) सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 च्या संख्येत असलेल्या महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला केला.

या घातपाती हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात शोधमोहिम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारला बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर गेले होते.

यावेळी अचानक नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी असून जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे. दरम्यान नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT