Ambadas Danve chandrakant khire esakal
महाराष्ट्र बातम्या

UBT First List : संभाजी नगरमधून खैरेंना तिकीट, मग दानवेंच्या इच्छेचं काय? स्वतःच दिलं स्पष्टीकरण

Ambadas Danve : ''माझ्या नशिबात लोकसभा आहे, मला ज्योतिषांनी सांगितलंय'' असं सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या तिकीटाची प्रतीक्षा करणारे अंबादास दानवे पुन्हा एकदा मागे राहिले आहेत.

संतोष कानडे

Ambadas Danve : ''माझ्या नशिबात लोकसभा आहे, मला ज्योतिषांनी सांगितलंय'' असं सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या तिकीटाची प्रतीक्षा करणारे अंबादास दानवे पुन्हा एकदा मागे राहिले आहेत.

ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांची यादी

  • बुलढाणा- नरेंद्र खेडेकर

  • यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख

  • मावळ- संजोग वाघेरे-पाटील

  • सांगली- चंद्रहार पाटील

  • हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

  • संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

  • धाराशिव- ओमराजे निंबाळकर

  • शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे

  • नाशिक- राजाभाऊ वाजे

  • रायगड- अनंत गिते

  • सिंधुदुर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत

  • ठाणे- राजन विचारे

  • मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील

  • मुंबई-दक्षिण- अरविंद सावंत

  • मुंबई वायव्य- अमोल कीर्तीकर

  • परभणी- संजय जाधव

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विधान परिषेदे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधून पक्षाच्या मनात माझ्याविषयी दुसरा प्लॅन असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपण पक्षावर नाराज नसल्याचंही ते म्हणाले.

काय म्हणाले अंबादास दानवे?

  • पक्षाने पदाधिकारी, जनता यांची मतं जाणून घेऊन उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये पोहोचतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

  • मी २०१४ पासून उमेदवारीसाठी इच्छूक होतो. परंतु मी नराज नाही. शिवसेना आणि पक्षप्रमुखांचं एक नातं आहे. संभाजीनगरसहीत सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे.

  • व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित मला महत्त्वाचं वाटतं. यापेक्षा माझं काहीतरी चांगलं होईल, यापूर्वी संघटनेत जी गद्दारी झाली ती पुन्हा होणार नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन करुन सोबत असल्याचं आश्वस्त केलं.

  • मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे, जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे. शिवाय विरोधी पक्षनेते पदाची धुरा माझ्याकडेच आहे. त्यामुळे पक्षाने मला खूपकाही दिलेलं आहे.

  • भाजपने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हुकूमशाही सुरु केली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या इतर पक्षाने ताकदीने उभं राहाणं गरजेचं आहे. असं अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Thane News: डोंबिवली सर्पदंश प्रकरण; डॉ. संजय जाधव निलंबित, पालिका आयुक्तांकडून मोठी कारवाई

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Kannad Accident : तेलवाडीजवळ दुचाकीला पिकअपचा अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मंचर येथून परांडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी किराणा साहित्याचे दोन ट्रक रवाना

SCROLL FOR NEXT