Uday samant on timing of Maharashtra Bhushan Award ceremony 13 death of heat stroke cm eknath shinde  
महाराष्ट्र बातम्या

Kharghar Death : कार्यक्रम संध्याकाळी का घेतला नाही? उदय सामंत म्हणतात, मुख्यमंत्री म्हणाले…

रोहित कणसे

नवी मुंबईच्या खारघरमध्ये काल आप्पासाहेब धर्माधिकारी एका भव्य सोहळ्यादरम्यान महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. मात्र महाराष्ट्र भूषण प्रादान कार्यक्रमादरम्यान लाखोंच्या संख्येने श्री सेवक जमा झाले होते. यापैकी १३ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यानंतर राज्यातील राजकीय वातवरण यावरून चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे.

हा कार्यक्रम भर उन्हात दुपारी घेण्यात आल्यावरून राजकीय क्षेत्रातून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच हा कार्यक्रम संध्याकाळी का घेण्यात आला नाही? असा सवाल देखील विचारला जात आहे. यादरम्यान खारघरचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

याबद्दल विरोधीपक्षांच्या प्रश्नाचे उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना संध्याकाळी कार्यक्रम घ्यायचा होता. मात्र श्री सदस्यांनी विनंती केली की आम्हाला घरी जायला उशीर होईल. त्यामुळे कार्यक्रम सकाळी घेण्यात आला.

उदय सामंतांनी दिलं स्पष्टीकरण..

दरम्यान आतापर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या १३ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला नाहीये. या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देताना सामंत म्हणाले की, उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र भूषण कार्यकर्मात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. मात्र अशा घटनेचं राजकारण करू नये, उलट विरोधकांनी अशावेळी एकत्र यायला हवं.

कार्यक्रमासाठी मदतीनीस ६०० होते, नर्स १५० होत्या, रुग्णवाहिका ७३ होत्या. अमराईमध्ये ४ हजार बेडचं हॉस्पिटल सज्ज होतं. इतर हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्यात आले होते. तसेच १ हजार ५० बसेस होत्या. जास्तीत जास्त सुविधा श्री सदस्यांना देण्यात आलेल्या होत्या.

हेही वाचा - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दोन दिवसात वातावरण बदललं..

सामंत पुढे बोलताना म्हणाले की, मागील दोन दिवसात अचानक वातावरण बदललं. त्यामुळे तापमान ३४ ते ३५ पर्यंत पोहोचलं. अनेक लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आदल्या दिवशीच आलेली होती. श्रीसेवक ज्या श्रद्धेने आली होती, त्यांना थांबवण कठीण होतं, असंही सामंत म्हणाले. कार्यक्रमाला २० ते २२ लाख लोक सामील झाले होते. प्रशासनाने हुकूमशाही करून कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला नव्हता. मात्र याच्यातही राजकारण केलं जातं, हे दुर्दैवी आहे. या घटनेचं समर्थन करता येणार नाही. पण यावर सांघिकपणे सर्वांना दिलासा देणं आवश्यक होतं, असंही सामंत यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT