Uday Samant Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री शिंदे शेवटच्या रांगेत; टीकेवरून सामंत म्हणाले "...पण ते कुणाला दिसलं नाही"

केंद्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काल दिल्लीत निती आयोगाची बैठक पार पडली आहे. या बैठकीदरम्यानच्या एका फोटोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. अनेकांनी दिल्लीत महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका केली होती. विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप सरकारवर धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(Uday Samant Marathi News Update)

काल दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीनंतरच्या एका फोटोत मुख्यमंत्री शिंदे शेवटच्या रांगेत दिसून आलो होते. त्यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी मिश्कील टीका केली. त्याचबरोबर देशाचे आर्थिक इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला शेवटच्या रांगेत स्थान का असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. "एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!" असं ट्वीट रोहित पवारांनी केलं होतं.

त्यानंतर उदय सामंतांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे हे फक्त फोटो काढण्यासाठी तिथे उभे आहेत. पण राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यावेळी ते पहिल्या रांगेत होते पण ते कुणाला दिसलं नाही आणि त्यावर कोणीही बोलले नाही हे तर आपलं दुर्दैव आहे." असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्याबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत अपमान झाला असं मला वाटत नाही असंही सामंत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Bandh: २० मे रोजी देशभरात मेडिकल सेवा बंद! कारण काय, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या नेमक्या काय?

स्मशानात राहणाऱ्या बाईला प्रसिद्ध अभिनेत्याने घरी आणून केलेली सेवा; मृत्यूसमयी तिने दिलेल्या आशीर्वादाने बदललं नशीब

Sangli Constable Bribery Case : न्यायालयीन कोठडी मिळवून देतो, सांगलीतील हवालदाराने आरोपीकडे मागितली लाच, आरोपीनेच पकडून दिलं रंगेहाथ

Kalyan Accident: दुर्दैवी! महापालिकेच्या कंट्राती कचरा गाडीखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, आईचा मन हेलावणारा टाहो

CharDham Railway News : बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला रेल्वे मिरज, सांगली मार्गे सुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT