Udaya Samant on Vanchit Bahujan Aghadi Thackeray Faction alliance said we have Ramdas Athawale  
महाराष्ट्र बातम्या

VBA-Uddhav Thackeray Alliance : वंचित-ठाकरे गट युतीवर सामंतांची प्रतिक्रिया म्हणाले, त्यांच्याकडे आंबेडकर तर आमच्याकडे…

सकाळ डिजिटल टीम

शिंदे-भाजपविरोधात उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार मंत्री उदय सामंत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर कोणत्याही युतीचा परिणाम होणार नाही असं म्हटलं आहे.

वंचित-ठाकरे युतीने फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत यावर बोलताना ते म्हणाले की, शिंदे- फडणवीस सरकारवर कोणत्याही युतीचा परिणाम होणार नाही.आमच्याकडे रामदास आठवले आहेत.

तसेच मागील बऱ्याच दिवसांपासून मध्यावधी निवडणूका लागणार अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे. यावर बोलताना मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत असे उदय सामंत यांनी सांगितले. निवडणूकांची शक्यता नसली तरी भविष्यात भाजप- बाळासाहेबांची शिवसेना यांचं सरकार येईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

पुन्हा १०-१२ आमदार संपर्कात

राज्यातील १०-१२ आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. यामध्ये कोण कोण आमदार आहेत असे विचारले असता सामंत यांनी जर मी आज जाहीर केले तर मग सिक्रेट काय राहणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत यांनी आज गोलमेज परिषदेला हजेरी लावणार असून फेडरल रिपब्लिक ॲाफ जर्मनीचे राजदूत यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही असेही सामंत म्हणाल आहेत.

आजची बैठकही जर्मनच्या शिष्टमंडळासोबत आहे, जर्मनचे राजदूत, शिष्टमंडळ यांच्यासोबत राज्यातील गुंतवणूकीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र बेस असलेल्या उद्योगपतींचा सहभाग आहे, या बैठकीनंतर भारत-जर्मन यांच्यातले संबंध दृढ होतील. तसेच आज सकाळी सिनारमास नावाचा बाहेर जाणारा प्रकल्प आम्ही थांबवला असेही ते म्हणाले. २० हजार कोटीच्या प्रकल्पासाठी सिएम, डिसीएम यांनी पत्र दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ३०० हेक्टरची जागा लागणार त्यासाठीही पत्र दिलं आहे असेही सामंत यांनी सांगितले.

या सरकारच्या कालावधीत प्रकल्प बाहेर गेले हे म्हणणं उचित ठरणार नाही. याबाबत माजी न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार अशी माहिती देखील त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT