Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

मनात विकृती असणाऱ्यांनी संभाजी महाराजांची बदनामी केलीय : उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजही श्रेष्ठ होते; पण..

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या हटके स्टाईलमुळं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये खूपच प्रिय आहेत. मात्र, हेच उदयनराजे काल पुन्हा भावूक झाल्याचं पहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजही (Chhatrapati Sambhaji Maharaj) श्रेष्ठ होते; पण कारण नसताना त्यांना बदनाम करण्यात आलं, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आणि ते भावूक झाले.

मनात विकृती असणाऱ्यांनी संभाजीराजेंची बदनामी केलीय. धाडस असेल तर अशा लोकांनी कोणत्याही व्यासपीठावर येऊन माझ्यासोबत उघडपणे चर्चा करावी, असं थेट आव्हान त्यांनी दिलं. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात शिवराज्याभिषेक नाट्य आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना उदयनराजेंनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल भाष्य केलंय. कोविड नियमांमधून थोडी सुट मिळाल्यामुळं यंदा उदयनराजेंचा वाढदिवस (Udayanraje Birthday) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय.

दरम्यान, एका कार्यक्रमात उदयनराजेंनी संभाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर झालेल्या बदनामीचा आणि षडयंत्रांचा निषेध नोंदवला. साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळीही बोलताना उदयनराजे भावूक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: बंगळुरू-गुजरात Qualifier-1 मध्ये फायनलसाठी भिडणार! पण कुठे आणि कधी होणार सामना? सर्व डिटेल्स घ्या जाणून

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! 'या' मार्गावर १० दिवस ब्लॉक, लोकलच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर

Mumbai Crime: जागेच्या वादातून प्रवाशाला मारहाण, दहा लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास; २५ दिवसांनी तक्रार

एक बिहारी, भल्याभल्यांवर भारी! रोहित, विराट धोनी नाही; IPL 2026 मध्ये बिहारच्या ३ पोरांनीच कशी मारली बाजी?

Marathi Live News update: छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध असल्याची प्रशासनाची माहिती

SCROLL FOR NEXT