UdyanRaje Bhosale
UdyanRaje Bhosale Sakal
महाराष्ट्र

RajyaSabha Election Result: भाजपचा दमदार विजय; उदयनराजेंचं ट्वीट

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकातील हायव्होल्टेज ड्रामानंतर अखेर रात्री साडेतीन वाजता निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी भाजपच्या तीन आणि महाविकासआघाडीच्या तीन उमेदवारांची वर्णी लागली असून भाजपच्या तीनही उभे असलेल्या उमेदवारांनी विजयी बाजी मारली आहे. या विजयानंतर भाजपचे राज्यसभेवरीस खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांच पाटील यांचे कौतुक केले आहे.

(UdyanRaje Bhosale On RajyaSabha Election Result)

"राज्यसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..!" असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

दरम्यान भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला असून शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा विजय झाला आहे. तर धनंजय महाडिक यांच्या विरोधात असलेले शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर भाजपच्या गोटातून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अपक्ष उमेदवारांना भाजप पक्ष विश्वासार्ह वाटला म्हणून त्यांनी आम्हाला मत केलं असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला असून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा विजय झाला आहे. तर सातवे उमेदवार असलेले संजय पवार यांचा पराभव झाला. भाजपने आणि मविआने काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेतल्याने निवडणुकीचा निकाल लांबला होता. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत अवैध ठरवलं होतं. त्यानंतर रात्री तीन साडेतीनच्या सुमारास हा निकाल लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT