udayanraje bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

Udayanraje Bhosale : सत्ता ठराविक घराण्यांच्याच हातात; उदयनराजेंचा रोख कोणाकडे?

सकाळ डिजिटल टीम

सातारा - महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांकडून हे करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निगडीत नेत्यांकडून महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरून भाजपचे खासदार छत्रपती छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी आज साताऱ्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकशाहीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. (Udayanraje Bhosale news in Marathi)

उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. जगात अनेक देशांमध्ये अजुनही राजेशाही आहे. शिवाजी महाराजही राजेशाही ठेवू शकले असते. मात्र त्यांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. जगात एकमेव छत्रपती शिवाजी महाराजच होते की, त्यांना वाटत होतं की, लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा, असं वाटत होतं

जाती-जातीमध्ये वैयक्तीक स्वार्थापायी वाद निर्माण केले जात आहेत. सर्वधर्मसमभावाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली नसती तर आज परिस्थिती आणखी भीषण असती. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर लोकशाहीतील राज्यांनी केलं तर काय? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. तसेच आता ठरविक घराण्यांच्याच हाती सुत्रं गेल्याचं उदयनराजे म्हणाले. मात्र उदयनराजेंचा रोख कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT