Sharad Pawar vs Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

सकाळ डिजिटल टीम

शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

कोल्हापूर : राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या ४ महिन्यापासून सुरूय. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike Maharashtra) चिघळला. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणांना देखील याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. शरद पवारांच्या घरावर झालेल्या या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (Udhav Thackeray) चौकशीचे आदेश दिलेत. पोलिसांनी आता या प्रकरणात कारवाईला सुरुवात केलीय. या प्रकरणानंतर पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केलीय.

शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. 'या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिलीय. या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावलाय.

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री काळात चांगले काम केले. तेव्हा शिवसेनाहीसोबत (Shiv Sena) होती. आज जे सत्तेत आहेत. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलंय. त्यांचा विसर सरकारला पडलाय. नाराजी दूर करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. विकास थांबला आहे. त्याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. सत्ता कोणाचीही असो लोकांच्या विकासावर गदा येता कामा नये. लोकशाहीच्या प्रक्रियेत निवडणुका अटळ आहेत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या प्रगतीला उत्तर देणारी असेल, असंही उदयनराजेंनी म्हंटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

Latest Marathi News Live Update : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 16 हजार 717 पदांसाठी होणार भरती

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

SCROLL FOR NEXT