Udayanraje Bhosale Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Udayanraje Bhosale Latest News: मी राष्‍ट्रवादी सोडली, त्‍याचवेळी वाघनख्‍या-तलवारी द्यायला पाहिजे होत्‍या; असं का म्हणाले उदयनराजे?

Maharashtra Politics : उद्या मी म्‍हणेन मला मंत्रिपद द्या; पण मला त्‍यात इंटरेस्ट नाही.

सकाळ डिजिटल टीम

'आपण देवेंद्र फडणवीस यांची मते ऐकली असतील. त्‍यांनी अत्‍यंत उत्कृष्ट मांडणी केली आहे. त्‍याबाबत त्‍यांचे जे मत आहे तेच माझेही आहे.'

Satara News: पद कोण सांभाळतं याला फारसे महत्त्‍व नाही. लोकांची कामे होणे महत्त्‍वाचे आहे. माझ्‍या मंत्रिपदाबाबत अफवा आहेत. मी माझे काम करत असतो, असे वक्‍तव्‍य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान मंत्रिपद मिळावे, असे प्रत्‍येकाला वाटणे स्‍वाभाविक आहे. जिल्ह्याला आणखी लोकप्रतिनिधित्व मिळाले, तर अजून कामे होतील; पण ते कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही हे माझ्‍या हातात नाही आणि मंत्रिपदासाठी मी का कोणाचे नाव सांगू. उद्या मी म्‍हणेन मला मंत्रिपद द्या; पण मला त्‍यात इंटरेस्ट नाही, अशी टिपणी उदयनराजेंनी यावेळी केली.

कास तलाव सुधारित बंदिस्‍त जलवाहिनीच्‍या कामाच्‍या भूमिपूजन कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्‍यांच्‍यासमवेत माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, वसंत लेवे यांच्‍यासह सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्‍थित होते.

राष्‍ट्रवादीतून गेलेल्‍यांना मंत्रिपद मिळाले, तुम्‍ही चार वर्षांपूर्वी राष्‍ट्रवादीतून भाजपत गेला, मात्र तुम्‍हाला अजूनही मंत्रिपद देण्‍यात आले नाही किंवा तसा निरोप देखील आला नाही या प्रश्‍‍नावर त्‍यांनी वरील टिपणी केली.

राष्‍ट्रवादीच्‍या फुटीनंतर आपण राज्‍यातील प्रमुख नेत्‍यांना भेटत तलवार आणि वाघनख्‍या भेट दिल्‍याबाबत विचारले असता ते म्‍हणाले, ‘‘मी ज्‍यावेळी राष्‍ट्रवादी सोडली, त्‍याचवेळी इतरांना वाघनख्‍या, तलवारी भेट दिल्‍या पाहिजे होत्‍या. तलवारी दिल्‍या म्‍हणजे, तो अधिकार आम्‍हाला नाहीतर दुसऱ्या कोणाला आहे. मला वाटले दिल्‍या. प्रत्‍येकाच्‍या घरात असावी.’’

अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍या बंडाबाबत विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर ते म्‍हणाले, ‘‘काल आपण देवेंद्र फडणवीस यांची मते ऐकली असतील. त्‍यांनी अत्‍यंत उत्कृष्ट मांडणी केली आहे. त्‍याबाबत त्‍यांचे जे मत आहे तेच माझेही आहे.’’

गेल्‍या काही दिवसांतील भाजपच्‍या नेत्‍यांच्‍या गाठीभेटी आणि मंत्रिमंडळ विस्‍ताराबाबत छेडले असता ते म्‍हणाले, की भेटलो नाही तर तुम्‍हीच म्‍हणणार हे तुटक वागतायत. भेटीत मी त्‍यांना साताऱ्याचे सामाजिक चळवळींतील योगदान सांगितले. या दरम्‍यान जिल्‍हा बँक संचालकांच्‍या युरोप दौऱ्यावर टीका करत कास, तापोळ्यासह परिसरातील पर्यटनास चालना मिळावी, यासाठी आराखडा तयार करणार असल्‍याचेही त्‍यांनी या वेळी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT