udayanraje 
महाराष्ट्र बातम्या

फासे पलटले; भाजपप्रवेशासाठी उदयनराजेंच्या चार अटी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादीचे नेते खा. उदयनराजे हे प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत असून त्यांनी या संदर्भातच काल (ता.11) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली आहे. परंतु उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पक्षप्रवेशासाठी चार अटी समोर ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. काही निवडक कार्यकर्त्यांशी उदयनराजेंनी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली. या चर्चेतून भाजपमध्ये न जाण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनी दिला होता. पण, काल (ता.11) उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यावर उदयनराजेंनी चार अटी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये मोदी यांच्या उपस्थितीत पक्ष भाजप प्रवेश व्हायला हवा, तसेच विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी अशा अटींचा समावेश असल्याची माहिती देण्यात येत आहे.

उदयनराजे हे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर भाजपने त्यांना गळ घातली आहे. त्यावर उदयनराजेंनी अटी समोर केल्या असून आता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबतची भेट सकारात्मक झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT