political esakal
महाराष्ट्र बातम्या

'बॉम्बचा आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका'

सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा, असे म्हणत भाषणाच्या शेवटी ठाकरे यांनी आभार मानताना हा चिमटा काढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा, असे म्हणत भाषणाच्या शेवटी ठाकरे यांनी आभार मानताना हा चिमटा काढला आहे.

बारामती - दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणत आहेत, यंदा दिवाळीला फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. हे सर्व ठीक आहे. आवाज होऊ द्या, पण धूर काढू नका, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 'करोना तसा अजून गेलेला नाही. सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा, असे म्हणत भाषणाच्या शेवटी ठाकरे यांनी आभार मानताना हा चिमटा काढला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिवाळीनंतर राज्यात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामतीमधल्या इन्क्युबेशन सेंटरच्या उद्धाटनाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले. ते म्हणाले, '५० वर्षांपूर्वीची बारामती काय आणि कशी होती हे आपल्याला माहिती आहे. मागील काही वर्षांत पवार साहेबांनी दगडालाही पाझर फोडून दाखवला आहे. परदेशात जाऊन तिथल्या गोष्टी माझ्याकडे झाल्याच पाहिजेत आणि ते मी करणार, असा त्यांचा अट्टहास असतो. ही वृत्ती असायला हवी', असही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वांनाच माहिती होती. ते असताना मला नेहमी म्हणायचे आपण बारामतीला जाऊन शरदबाबू काय करतोय ते पाहायला पाहिजे. राजकारणात पटत नसले तरी चांगल्या कामात अडथळे आणणं ही आपली संस्कृती नाही. अगदी पाठिंबा देता येत नसला तरी त्यात विघ्न तरी आणू नये, विघ्नसंतोषी लोक खूप असतात हे विघ्नसंतोषी लोकांचे काम असत, कामातील आनंद त्यांना कधीच समजत नाही, टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT