Uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray News : शरद पवारांनंतर ठाकरे देखील मैदानात! संजय राठोडांच्या बालेकिल्ल्यात घेणार सभा

रोहित कणसे

राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी पक्षाच्या फेर उभारणीसाठी महराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आजपासून राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव यांच्या दौऱ्यावर सहमती झाली होती.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्याची सुरूवात दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्याने करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आज यवतमाळ येथे पोहरादेवीच्या दर्शनानंतर दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समीती येथे सभा घेणार आहेत.

दरम्यान पक्षात पडलेले उभी फूट आणि मुख्यमंत्री पद गमावल्यांतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवी येथे येत आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या विदर्भ दौऱ्यात शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी समान नागरी संहिता (यूसीसी)बाबत पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. आमचा यूसीसीला पाठिंबा असून या प्रकरणावर पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, जोपर्यंत UCC मसुदा तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाहीत असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

शनिवारी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्रतेच्या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. शिंदे गटाच्या ४० आणि उद्धव गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याचे नार्वेकरांनी सांगितले. आमदारांना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली. पक्षाच्या अध्यक्षानंतर सर्वात ज्येष्ठ नेत्याला हे पद दिले जाते. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

शरद पवारही महाराष्ट्र दौऱ्यावर

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारही शनिवारपासून राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी नाशिकमधील येवला या छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांवर निशाणा देखील साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, मी काही लोकांवर विश्वास ठेवून चूक केली, आता अशी चूक पुन्हा करणार नाही.

२ जुलै रोजी अजित पवार ८ आमदारांसह महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले. यानंतर शरद पवार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. दुसरीकडे अजित पवार यांनी स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष घोषित केले. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याच्या मुद्द्यावर अजित यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT