महाराष्ट्र बातम्या

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

''मातोश्री निवासस्थानी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दोघांची सहमती झाली आणि मग मला बोलावलं. त्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलायचं, याची उजळणी माझ्याकडून करवून घेतली. पत्रकार परिषदेमध्ये मी एकट्यानेच भूमिका मांडली आणि प्रश्नोत्तरे झाली नाहीत.''

संतोष कानडे

Loksabha election 2024 : 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विरोधात विधानं केली होती. परंतु नंतर दोन्ही पक्षांमध्ये पॅचअप झालं. त्यावेळी अमित शाह 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. माध्यमांशी बोलण्यापूर्वी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितलं होतं. परंतु अमित शाहांनी त्याला नकार दिला होता. त्यामुळे आमच्यातली बोलणी थांबली होती. त्यानंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरेंनी मध्यस्थाला पाठवून चर्चेची तयारी दर्शवली होती.

''उद्धव ठाकरेंनी जास्तीची मंत्रिपदं, चांगली खाती आणि काही जागा मागितल्या होत्या. त्यावर चर्चा झाली.. सगळं ठरलं आणि त्यांनी अमित शाहांनी 'मातोश्री'वर यावं,अशी अट घातली. अमित शाहांनी नवीन कोणतेही इश्यू काढू नका, असं म्हणत येण्याची तयारी दर्शवली आणि ते आले.'' असा घटनाक्रम फडणवीसांनी सांगितला.

फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दोघांची सहमती झाली आणि मग मला बोलावलं. त्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलायचं, याची उजळणी माझ्याकडून करवून घेतली. पत्रकार परिषदेमध्ये मी एकट्यानेच भूमिका मांडली आणि प्रश्नोत्तरे झाली नाहीत.

या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते, याची आठवण फडणवीसांनी सांगितली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मला म्हटले, देवेंद्रजी मी भाजपविरोधात बोलले आहे. आता मला यू टर्न घ्यायचा आहे. त्यामुळे मला काही बोलता येणार नाही. परंतु आपल्याला काहीतरी मिळालंय, असं शिवसैनिकांना वाटलं पाहिजे, असं बोला. त्यानंतर पत्रकार परिषद झाली, असं फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT