Political News
Political News esakal
महाराष्ट्र

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले, म्हणाले....

सकाळ डिजिटल टीम

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घटना सातत्याने घडत आहे. राज्यात अधिवेशनापासून गृहमंत्रालयाच्या कारवायांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यातच पेनड्राईव्ह प्रकरणात गृहमंत्र्यांची महत्वाची भूमिका राहिली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर आज गृहमंत्री वळसे पाटील यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे नाराज या वृत्ताचे आता मुख्यमंत्री ठाकेर यांनी खंडन केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल एक तासा पेक्षा अधिक सुरु असलेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला असून अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणि ते उत्तम काम करत आहेत असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे केंद्रिय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. गृह खात्याकडूनही भाजवर काही गंभीर आरोप केले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माहिती समोर येत आहे. मात्र या नाराजीच्या वृत्ताच मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं आहे. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

दरम्यान, राज्यातील गृह विभागाच्या कारभार यावरून वळसे यावर काँग्रेस सेनेने नाराजी व्यक्त केली. त्याची ही परिणीती असल्याची चर्चा आहे. गृहमंत्रालयाने प्रवीण दरेकरांच्या प्रकरणात अद्याप अहवाल दिलेला नाही. पोलिसांच्या बदलांच्या संदर्भात महत्वाचे निर्णय अद्याप पेंडिंग आहेत. संजय राऊत यांनी गृहखातं सक्षम असणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दहा डिसीपींच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बदलण्यात आल्या. मधील काळात आय़पीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात चर्चा होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मार्च महिन्यात घेण्याचं सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Shirur Lok Sabha: शिरुरमधील मतदाराला मतदानावेळी आली अडचण, थेट शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता; नेमकं काय झालं होतं?

KL Rahul: जो बुंद से गई वो... प्रेक्षकांसमोर झापल्यानंतर राहुलबरोबर संजीव गोयंकांचे डिनर कोणालाच पचेना

Marathi News Live Update: बेकायदा होर्डिंगविरोधात २४० तक्रारी, पण कारवाई नाही; उदय सामंत यांचा आरोप

SCROLL FOR NEXT