Uddhav Thackeray devendra fadnavis eknath shinde ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : कोरोना काळात हीच आरोग्य यंत्रणा होती; नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त

रवींद्र देशमुख

मुंबई - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे हे घडलं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे अस्वस्थ झालो आहे. विषय रोज नवीन-नवीन आहेत. काही विषय खूप वर्षांपासून तसेच्या तसे आहेत. आज मी जरा अस्वस्थ आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत, ते बघितल्यानंतर चीड येते. आज मी मुख्यमंत्री नाहीये, मविआ सरकार नाहीये. मात्र आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना या आरोग्य व्यवस्थेने केला होता. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना काळात मुंबई मॉडेल असेल, दुर्गम भागात औषधे पुरवलीत. ड्रोनने दुर्गम भागात औषधे पुरवली. मी देखील दुर्गम भागात भेट दिली होती. अनेक डॉक्टर-नर्सचा मृत्यू झाला. आज त्यांना बदनाम केलं जातंय. ठाणे हॉस्पिटल असेल...दुर्घटना घडताहेत, मुख्यमंत्री कुठे आहेत. एक फुल दोन हाफ कुठे आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आहे. एक फुल, एक हाफ दिल्लीत आहेत. दुसरा हाफ कुठे आहे, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT