Uddhav Thackeray and Bacchu Kadu  
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu : ठाकरेंनी चोळलं बच्चू कडूंच्या जखमेवर मीठ; म्हणाले आम्ही तर मंत्री...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आणि भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या जखमेवर मीठ चोळलं. (Uddhav Thackeray attack on Bacchu Kadu)

उद्धव ठाकरे म्हणाले की, विदर्भात बैलांना सजवलं होतं आणि त्या बैलांवरती लिहलं होतं पन्नास खोके एकदम ओखे. तुमच्या विदर्भातलेच एक नेते ज्यांना आपण आपल्या मंत्रिमंडळात मंत्री केलं होतं. पण त्यांना ते पचलं नाही. समोर ताट वाढलेलं होतं. पण ते पचवता आलं नाही. आता फिरतायेत सगळीकडे. याच बच्चू कडूंनी सांगितलं की, आम्ही लग्नात गेलो तरी लोक खोकेवाले आले म्हणतात, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, तुम्ही पन्नास पन्नास खोके घेतले, त्यापैकी काही खोके या माझ्या शेतकऱ्याला दिले तर त्याचा जीव वाचवू शकतो, त्याची शेती वाचवू शकते. मात्र या सरकारकडून काही आशा अपेक्षा राहिलेली नाहीये. या गद्दारांचं खाली डोकं वर पाय करणार का, असा प्रश्न उद्धव यांनी यावेळी उपस्थितांना विचारला.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांची जुनी ऑडियो क्लीप लावून फडणवीसांचं जुनं भाषण जाहीर सभेत ऐकवलं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, मध्यप्रदेश सरकारने साडेसहा हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांचे वीजबील माफ केलं होतं. या सरकारने देखील मध्यप्रदेश पॅटर्न राबवायला हवा, असंही फडणवीस म्हणताना ऐकायला येत होते. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT