Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

MVA Rally : मोदींची अशी कोणती डिग्री, जी पाहायला २५ हजार रुपये लागतात; ठाकरेंचा खोचक सवाल

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर - माहाविकास आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तिन्ही पक्षांनी मिळून ही सभा आयोजित केल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. अवश्य काढा. सध्या अनेक ठिकाणी हिंदु जनआक्रोश यात्रा काढण्यात येतोय. मुंबईतही हा मोर्चा निघाला. शिवसेना भवनासमोर हा मोर्चा आला होता. सध्या देशाचे पंतप्रधान हिंदू आहेत. तरी तुम्हाला हिंदू जनआक्रोश मोर्चा का काढावा लागतो, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून हल्ला चढवला. उद्धव म्हणाले की, देशात तरुणांकडे पदव्या आहेत. ते पदव्या दाखवतात, त्यांना सांगण्यात येत तुम्ही घरी जा. पण यांची पदवी मागितली की, २५ हजार रुपये दंड होतो. अशी कोणती डिग्री आहे, की ती पाहण्यासाठी २५ हजार रुपये लागतात, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT