Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : २५ वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, तशीच काँग्रेसही होणार नाही; ठाकरेंचं प्रत्युत्तर

रवींद्र देशमुख

जळगाव - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणालेकी, काही लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्या हवेच्या जोरावर हे फुग्यासारखे हवेत गेले आहेत. त्या फुग्यांना टाचणी लावण्याचं काम तुम्हा सर्वांना करायचं आहे.

१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्याच्यानावावर लुटालूट करण्याचं काम सरकारचं सुरू आहे. वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा मुक्त केला. हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांनी रोखलं. मात्र भाजपकडून महापुरुष चोरले जातात. भाजपने सरदार पटेल यांचा पुतळा उभारला. त्यांनंतर सुभाषचंद्र बोस यांना चोरलं. अगदी माझे वडील देखील चोरले. भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सत्ता आली काय गेली काय? मी सत्तेसाठी धडपडत नाही. देशाचं नेतृत्व करण्याची स्वप्न मला पडत नाही. जागं करण्याचं काम मला वंश परंपरेने आलं असल्याचं ठाकरे म्हणाले. ते पुढं म्हणाले की, सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. २५ वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जावून शिवसेनाची काँग्रेस होऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT