Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: मंत्रीपद जातील, पण गद्दारीच्या शिक्क्याचं काय? ठाकरेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बहुचर्चित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर पहिल्या शब्दापासून हल्लाबोल चढवला. उद्धव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला गद्दार म्हटलं. (Uddhav Thackeray news in Marathi)

उद्धव म्हणाले की, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि दसरा मेळावा माझ्या लक्षात आहे. मात्र आजचा मेळावा हा अभुतपूर्व आहे. मी मनापासून सांगतो भारावून गेलो आहे. पण मी खरच किती बोलू शकेल शब्द सुचत नाही. हे विकत मिळत नसतं. ही कोरडी गर्दी नाही. अंतकरणापासून आलेली गर्दी आहे. मी पहिल्यांदा आपल्यासमोर नतमस्तक होतो, असही ठाकरे यांनी म्हटलं.

जनतेचं हेच ते प्रेम आहे ज्यानं प्रत्येकवेळी मनगटाचं संरक्षण केलं. ज्यांनी गद्दारी केली. होय मी त्यांना गद्दारच म्हणणार. तुमची मंत्रीपदं काही दिवसात जातील. पण , कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही. या जन्मी तरी नाही, अशी टीका उद्धव यांनी केली.

ज्यांना आपण मंत्रीपदं दिलीत, ज्यांना दिलं ते नाराज झाले. पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही ते आजही माझ्यासोबत आहेत. शिवसेना एकट्याची नाही...तुम्ही जेव्हा सांगाल मला की तुम्ही जावा मी जाईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT