uddhav thackeray criticize bjp govt arvind kejriwal arrest electoral bond
uddhav thackeray criticize bjp govt arvind kejriwal arrest electoral bond Sakal
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : पनवेलकरांसाठी उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा...; मनसे पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश

संतोष कानडे

Shivsena Uddhav Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर मनसेला गळती लागल्याचं चित्र दिसून येतंय. मनसेचे कार्यकर्ते या-ना त्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत.

पनवेलमधील मनसेच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीकास्र सोडलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पनवेलमध्ये दुप्पटीने मालमत्ता कर आकारला जातोय. मालमत्ता कर भरु नये, असं आमचं म्हणणं नाही. परंतु अन्यायकारक कर लादू नयेत. एकीकडे मनपाचा हा कर तर दुसरीकडे सीडकोकडून करवसुली सुरुच आहे. ज्या सुविधाच मिळत नाहीत, त्यांचा कर का घेता? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी मुंबईकरांना एक वचन दिलं होतं. ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांचा कर माफ करण्याचं. ते वचन आम्ही पूर्ण केलं. आता आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर या दुहेरी करातून पनवेलकरांची मुक्तता केली जाईल.

''मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे. आता नवीन ताकद आपल्यासोबत जोडली जातेय. येत्या निवडणुकीत भाजप सत्तेत येणार नाही. त्यामुळे सर्वांनी ताकदीने महाआघाडीसोबत उभं राहावं'' असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT