Uddhav Thackeray Compares PM Modi With Aurangzeb Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Uddhav Thackeray: देशासह राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

आशुतोष मसगौंडे

देशासह राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्रातील उद्योग-धंदे, बेकारी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेमधील फुट यावर जोरदार भाष्य केले आहे. तसेच शरद पवार आणि मी म्हणजे संताजी धनाजी यांच्यासारखे असल्याचे म्हणत ठाकरे यांनी मोदींची औरंगजेबाशी तुलना केली आहे. (Uddhav Thackeray Compares PM Modi With Aurangzeb)

यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले की, महाराष्ट्रा येणाऱ्या मोदी आणि शहा यांचे तुम्ही क्रमांक एकचे टर्गेट आहात. आणि त्यानंतर ते शरद पवारांनाही टार्गेट करत आहे. तुम्ही दोघांनी राज्याची सुत्रे पुन्हा हाती घेतल्याने मोदी-शहांना भीती वाटतेय का?

याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "असं म्हणतात की मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसं आम्ही दोघे त्यांच्या खेचरांना दिसत असू."

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात अशी टीका तुमच्यावर होते, असे ठाकरे यांना विचारले. त्यावर त्यांनी नवझ शरीफ, पाकिस्तान आणि केकचा मुद्दा काढत मोदींची औरंजेबाशी तुलना केली.

ठाकरे म्हणाले, "न बोलावताही पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे लोक मला औरंगजेब फॅन म्हणू शकत नाहीत. कारण औरंगजेबदेखील गुजरातमध्ये जन्मला होता. जेसे हे दिल्लीला गेलेत तसेच औरंगजेब आग्र्याला जाऊन बसला होता. महाराष्ट्र जिंगण्यासाठी औरंगजेब 27 वर्षे इथे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्र्याला जाऊ शकला नव्हता हे त्यांनी लक्षात ठेवावे."

दरम्यान महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदा शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाली. अनेक मोठे-मोठे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडून गेले आहेत. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेत महाराष्ट्रभर दौरे करत प्रचाराची राळ उठवली आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपबरोबर गेल्याने सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सत्ताधारी टीका करत आहेत. हे दोन्ही नेते अनेकवेळा महाराष्ट्रातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचे टार्गेट ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT