Uddhav Thackeray and Amit Shah 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : आम्ही राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर तुम्ही...; ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

सकाळ डिजिटल टीम

खेड - शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे भाजपच्या राष्ट्रवादावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच भाजपच्या विविधी राज्यांतील युतीवरही टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या घराणेशाहीवर टीका करतात. तुमचा आगापिछा काय आहे ते पाहा. तुमची मुलं-बाळ कोणत्याही कमिटीची अध्यक्ष करायची. आताच निवडणूक झाली. कसब्यात साफ झाले. बंडखरी नसती तर तिथही यांचा सुफडा साफ झाला असता. अंधेरीत लढायची तुमची हिंमत नव्हती.

इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. मेघालय येथे निवडणूक झाली. हे अमित शहा तिकडे गेले होते. तिथले मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांच्यावर शहांनी भयानक आरोप केले होते. दोन कुटुंबांनीच गरीबांचा पैसा खालला. मेघालय देशातील भ्रष्ट राज्य आहे. तरी संगमांनी सत्ता मिळवली. त्यानंतर मोदींनी ट्विट करून म्हणतात, की आपण दोघं मिळून सरकार स्थापन करू. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच बरोबर गोंडा घोळतातय, असं उद्धव म्हणाले.

अमित शहा पुण्यात येऊन म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे तळवे चाटले. मग तुम्ही मेघालयात संगमांचं काय चाटताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तुमच्या बरोबर आला की चांगला आणि बाजुला गेला की भ्रष्ट अशी टीका उद्धव ठाकरे ठाकरेंनी केली. तसेच भाजप संपूर्ण देश नासवण्याचं काम करत असल्याचं उद्धव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे सलग तिसऱ्यांदा विजयी

SCROLL FOR NEXT